Akshaya Tritiya Mehendi Design 2024: दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. यावेळी अक्षय्य तृतीया शुक्रवारी 10 मे 2024 रोजी आहे. ही तारीख इतकी शुभ मानली जाते की, या दिवशी कोणतेही शुभ कर्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही, कारण ही तारीख चांगल्या मुहूर्त तारखेमध्ये समाविष्ट आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सर्व शुभ कार्ये केली जातात. या दिवशी केलेले स्नान, दान, यज्ञ, जप आणि तपश्चर्या केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणेही खूप शुभ मानले जाते. यामुळेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची मागणी अचानक वाढते, दरम्यान, अक्षय्य तृतीयेची लगबग सध्या सगळी कडे पाहायला मिळत आहे. उद्या अक्षय्य तृतीया आहे. अशा वेळी सोने खरेदी करणे तर आहेच परंतु घरासमोर सुंदर रांगोळी काढणे, सणाला मेहेंदी काढणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे, दरम्यान, अक्षय्य तृतीयेला काढता येतील अशा सुंदर मेहेंदी डिझाईन आम्ही घेऊन आलो आहोत, चला तर पाहूया
अक्षय्य तृतीयेला काढता येतील अशा सुंदर मेहेंदी डिझाईन
वर दिलेले सुंदर मेहेंदी डिझाईन तुम्ही तुमच्या हातावर काढू शकता, आणि अक्षय्य तृतीयेचा आनंद आणखी द्विगुणीत करू शकता. वर दिलेले मेहेंदी डिझाईन हटके असुन तुम्ही या डिझाईन काढल्यानंतर तुमचे हात आणखी सुंदर दिसणार, मग वाट कसली पाहताय!