Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image)

बौद्ध बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2019) दरवर्षी विजयादशमीच्या (Vijayadashmi) दिवशी साजरा केला जातो. यंदा देखील नागपूर (Nagpur)दीक्षाभूमी, दादर शिवाजी पार्क (Shivaji Park) याठिकाणी मोठ्या जल्लोषात 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रंगणार आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Aambedkar) यांनी 20व्या दशकात आजच्या दिवशी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्म (Buddha) स्वीकारला होता आणि इथूनच खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माच्या प्रसाराला अधिक चालना मिळाली.

बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी हाच दिवस का निवडला यामागे सुद्धा एक खास कारण आहे. असे म्हणतात इसवी सन पूर्व 3 ऱ्या शतकात सम्राट अशोकाने सुद्धा विजयादशमीच्या मुहूर्तावर बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यामुळे हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जात होता, मात्र कालांतराने बौद्ध धर्माच्या अनुयायांमध्ये घट होत होती, यांनतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेताच पुन्हा एकदा बौद्ध धर्माला नव्याने ओळख मिळाली. दरवर्षी बौद्ध अनुयायी श्रद्धेने हा दिवस साजरा करतात, त्यांच्या आनंदात भर पाडण्यासाठी यंदा या खास मराठी HD Greetings, Messages, Whatsapp Status आपल्या कुटुंब, मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा

63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक सदिच्छा

Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image)

63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image) Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image)

धम्मचक्र प्रवर्तन दिनी परामपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image) Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image)

63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणा सर्वांस खूप खूप शुभेच्छा

Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image) Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image)

समस्त बौद्ध बांधवाना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image) Dhammachkra Pravartan Din Wishes (Photo Credits: File Image)

बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेतली ती जागा दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आजही नागपूर दीक्षाभूमी येथे सायंकाळी 6 वाजल्यापासून मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात देशविदेशातील अनेक मान्यवर मंडळी, बौद्ध भिक्षु भाग घेणार आहेत.