सोशल मिडियाचा वाढता वापर लक्षात घेता सध्या फोटो काढणे ही जणू काळाची गरज बनत चालली आहे. आपण कुठे आहोत याची इत्यंभूत बातमी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर, फेसबुकवर अथवा इन्स्टावर ठेवण्यासाठी आहे त्या ठिकाणी आपले फोटो काढणे हे जणू फॅडच बनले आहे. पण हे स्टेटस ठेवण्याच्या नादात आपला फोटो कसा येतो याकडे आपण ब-याचदा दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेकदा आपण फोटोमध्ये जाड दिसतो किंवा आपला फोटो चांगला येत नाही. आणि मग आपल्या मित्रपरिवारात आपली खूप चेष्टा होते.
अशा वेळी फोटो काढताना आपल्या कोणत्या पोजेस असल्या पाहिजे हे माहित असणे फार गरजेचे आहे कारण तुमच्या वाईट फोटोजमुळे तुमचे मित्रपरिवारात हसेही होऊ शकते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा योग्य पोजेस सांगणार आहोत, जे फोटो काढण्यासाठी अगदी योग्य आहेत.
1. हात नेहमी वर असावा
ब-याचदा आपण एका बाजूने फोटो काढताना हात सरळ रेषेत खाली ठेवतो. पण त्यामुळे तुमचे दंड खूप जाडे वाटतात. त्यामुळे वन सायडेड फोटो काढताना आपला हात थोडे वर असावे अथवा कमरेवर ठेवून फोटो काढावा, जे दिसताना खूप चांगले वाटते.
2. खांद्यांमध्ये थोडे वाकून फोटो काढा
फोटो काढताना सरळ रेषेत उभे राहिल्याने तो फोटो खूपच डल आणि अशोभनीय वाटतो. अशा वेळी तुमच्या चेह-यावरचे भावही नीट कळत नाही. म्हणून फोटो काढताना तुमचा खांदा थोडासा वाकवला, आणि तुमची मानही थोडी वाकवून फोटो क्लिक केलात तर खूप चांगला फोटो येतो.
3. डोळ्यांच्या बुबुळांवर लक्ष केंद्रित करा
चेह-याचा एका बाजूने फोटो काढत असताना डोळ्यांच्या कडांकडे लक्ष केंद्रित न करता डोळ्यांच्या बुबुळांवर लक्ष द्या. म्हणजे तुमच्या सुंदर, रेखीव डोळ्यांचा खूप सुरेख असा फोटो येतो.
4. पाय थोडा पुढे घेऊन किंवा वाकवून फोटो काढा
फोटो काढताना कधीही सरळ रेषेत किंवा पाय लांब करुन फोटो काढू नये. आपला एक पाय थोडासा वाकवून किंवा किंचितसा पुढे घेऊन फोटो क्लिक केल्यास आपला कमनीय बांधा या फोटोमध्ये दिसतो.
5. एका बाजूने चेह-याचा फोटो काढताना हनुवटी नेहमी पुढे असावी
चेह-याचा एका बाजूने फोटो काढताना कधीही सर्वसाधारण हनुवटी न ठेवता ती किंचितशी पुढे काढून फोटो क्लिक केल्यास तो फोटो खूप चांगला येतो.
अभिनेत्री समीरा रेड्डी हिचे पाण्याखालील Baby Bump मधील फोटो सोशल मीडियात व्हायरल (Photo)
वर सांगितलेल्या 5 पोजेस फोटो काढताना लक्षात ठेवल्यास तुमचे फोटो खूपच सुंदर आणि आकर्षक येऊ शकतात. कदाचित एका मॉडेल ला लाजवतील असेही फोटो येऊ शकतात असे म्हणायला हरकत नाही.