Femina Miss India 2023 Winner: राजस्थानची Nandini Gupta ठरली यंदाची 'मिस इंडिया'; 19 वर्षीय नंदिनी बद्दल इथे घ्या जाणून
Nandini Gupta | Instagram

राजस्थान मधील कोटा येथील 19 वर्षीय नंदिनी गुप्ता (Nandini Gupta) यंदाची Femina Miss India 2023 ची मानकरी ठरली आहे. दिल्लीची Shreya Poonja पहिली रनरअप तर मणीपूरची Thounaojam Strela Luwang दुसरी रनरअप आहे. यंदा हा सोहळा मणिपूरच्या इंफाळ मध्ये रंगला होता. आता नंदिनी यंदा होणार्‍या 71व्या Miss World या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे. तो सोहळा यावर्षी United Arab Emirates मध्ये रंगणार आहे.

नंदिनी गुप्ताने बिझनेस मॅनेजमेंटचे धडे घेतले आहेत. लहानपणापासूनच नंदिनीने हॉस्पिटॅलिटीचे धडे घेतले आहेत. ती विद्यार्थीनी आणि मॉडेल आहे. मिस इंडिया संस्थेच्या माहितीनुसार, रतन टाटा हे नंदिनीच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहेत. "त्यांनी मानवतेसाठी खूप काम केले आहे. आणि त्यांनी जे कमावले त्यातील बहुतांश दानधर्मासाठी वापरले. त्यामुळे लाखो लोकांचे त्यांच्यावर प्रेम आहे." असे तिने एका मुलाखतीत सांगितले. याव्यतिरिक्त, प्रियांका चोप्रा ही एक ब्यूटी क्वीन आहे जी तिला कामगिरीमुळे प्रेरित करते.

पहा नंदिनी गुप्ताचे फोटोज

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

यंदाच्या 59व्या मिस इंडिया स्पर्धेच्या या कार्यक्रमात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांनी सादरीकरण केले. तर मनीष पॉल आणि भूमी पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.