यूएसएच्या आर'बोनी गॅब्रिएल (R'Bonney Gabriel) हिच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. तिच्या रुपात जगाला नवी मिस युनिव्हर्स ( Miss Universe) मळाली आहे. हरनाज संधू (Harnaaz Kaur Sandhu) हिची उत्तराधीकारी ठरत तिने मिस युनिव्हर्स 2022 चे (Miss Universe 2022) विजेतेपद पटकावले. आज म्हणजेच 15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लिन्स (New Orleans ) येथे हा भव्य कार्यक्रम सोहळा रंगला. मिस युनिव्हर्सच्या अधिकृत ट्विटर खात्याने यूएसएच्या आर'च्या अचूक क्षणाची एक छोटी क्लिप पोस्ट केली आहे. जी सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे.
व्हिडिओत पाहायला मिळते की, सुंदर अशा क्रिस्टल गाऊनमध्ये आकर्षक आणि तितकीच सुंदर दिसत असणाऱ्या आर'बॉनी गॅब्रिएलने हिने हिने विजयाच्या अंतिम क्षणांची प्रतिक्षा केली. पंचांकडून काऊंटडाऊ झाले आणि तिचे नाव विजेता म्हणून उच्चारले गेले. उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रचंड जल्लोष केला. मिस युनिव्हर्स 2021 हरनाझ संधू हिने तिच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक क्षण असलेल्या आर'बोनी गॅब्रिएलचा मुकुट घातला. हरनाज संधूने 2021 मध्ये जवळपास दोन दशकांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब भारतात परत आणला होता. (हेही वाचा, Miss Diva Miss Universe India 2021 ची विजेती ठरली Harnaaz Sandhu; इस्त्राईलमध्ये होणाऱ्या 70 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व)
ट्विट
The new Miss Universe is USA!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/7vryvLV92Y
— Miss Universe (@MissUniverse) January 15, 2023
मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या 71 व्या पर्वात व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल प्रथम उपविजेती होती आणि डोमिनिकन रिपब्लिकची आंद्रेना मार्टिनेझ दुसरी उपविजेती होती. या वर्षी भारताचे प्रतिनिधित्व कर्नाटकच्या दिविता रायने केले आणि तिने टॉप 16 मध्ये स्थान मिळवले. मिस युनिव्हर्स 2022 च्या विजेतेपदासाठी 80 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला