Karwa Chauth 2020 Arabic Mehndi Designs: देशभरात करवा चौथ (Karwa Chauth) 4 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथचा उपवास करतात.या दिवशी महिलांच्या श्रृंगाराला विशेष महत्त्व असते म्हणून महिला नवीन कपड्यांसह दागदागिन्यांसह डोक्यापासून पायापर्यंत तयार असतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये महिला हे व्रत करतात.भारतीय परंपरेनुसार, हिंदीभाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटे स्नान करून शिव शंकराला व सूर्याला पाणी अर्पण करतात. त्यानंतर सकाळपासून ते रात्री चंद्रदर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात.यावर्षी तुमचा करवा चौथ अधिक आकर्षक करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास अरेबिक मेहंदीच्या डिझाईन (Mehndi Designs) घेऊन आलो आहोत. ( Karwa Chauth 2020 : जर तुम्ही पहिल्यांदाच करवा चौथचे व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा)
यंदाच्या करवा चौथला या सोप्या अरेबिक मेंहदी डिजाईन नक्की ट्राय करा.करवा चौथच्या संध्याकाळी चंद्रोदयानंतर स्त्रिया चाळणीतून चंद्राचा आणि आपल्या पतीचा चेहरा पाहतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर केलेला उपावास यावेळेस पती पत्नीला पाणी आणि अन्नाचा घास भरवून सोडतात. या बदल्यात स्त्रियांना पतीकडून भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.