International Trans Queen Contest 2019: भारताची ट्रान्स ब्यूटी क्विन-2018 वीणा सेंद्रे (Trans Beauty Queen-2018 Veena Sendre) आता भारताचे नाव जगभरात आणखी उंचावण्याच्या प्रयत्नात आहे. मुळची छत्तीसगड राज्यातील मंदिर हसौद, रायपूर येथे राहणारी वीणा सेंद्रे (Veena Sendre) आता मिस इंटरनॅशनल क्वीन कॉम्पीटीशन (Miss International Queen Competition) मध्ये सहभागी होत आहे. ही स्पर्धा बँकॉक येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 25 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत जगभरातील सुमारे 28 देशांतून स्पर्धक सहभागी होणार आहेत. छत्तीसगडची वीणा सेंद्रे ही देशाची मिस ट्रान्स क्वीन 2018 (Miss Trans Queen) विजेती आहे. गेल्याच वर्षी मुंबई येथे राष्ट्रीय पातळीवर पार पडलेल्या ब्यूटी कॉंटेस्टमध्ये (Beauty Contest) तिला ट्रान्स क्विन (Trans Queen) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सहभागी होणारे देश
International Trans Queen Contest 2019 या स्पर्धेत जगभरातून कॅनडा, चीन, इक्वाडोर, भारत, लाओस इंडोनेशिया, जापान, पेरु, फिलिपीन्स, थायलंड, व्हेनेझुयेला यांसह अनके देश सहभागी होणार आहेत. या वेळी ही स्पर्धा जिंकण्यासाठी केवळ मतदानच नव्हे तर, इतरही निकष लावण्यात येणार आहेत. (हेही वाचा, वीणा सेंद्रे: मादक डोळे, गुलाबी हसू, रॅम्पवॉक करणाऱ्या ट्रान्सजेंडरची अनोखी कहाणी)
स्पर्धा जिंकण्यासाठी निकष
सर्व स्पर्धकांसाठी एक इंट्रोडक्शन व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यात ज्या स्पर्धकाच्या वहिडिओला सोशल मीडिया जसे की फेसबुक, इंन्स्टाग्राम, युट्युब आदींवर जास्तीत जास्त लाईक आणि प्रतिक्रिया येतील आणि ज्या व्हिडिओची शेअर केलेली संख्या अधिक असे त्यांना अधिक गुण मिळतील. त्यातून निवड झालेले 12 स्पर्धक पुढील फेरीसाठी निवडले जातील. त्यानंतर टॉप-6 आणि टॉप-3 साठीही दोन फेऱ्या होतील. ज्यात प्रश्नोत्तरं आणि टॅलेंटच्या आधारावर निवड केली जाईल. ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओला अधिक पसंती मिळाली असेल त्याचे नशीब अंतिम फेरीत खुलेल.
विजेत्यांसाठी बक्षीस
दरम्यान, ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाला 10 हजाज यूएस डॉलर इतकी रक्कम मिळेल. तसेच, इतर विजेत्यांना 14,500 यूएस डॉलर इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. शिवाय वुडलैंड रिजॉर्ट येथे एक अपार्टमेंटही दिले जाईल.