पावसाळ्यात टॅटू किंवा पिअर्सरिंग करणार असाल तर सावधान, आजाराला बळी पडण्याची शक्यता
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या तरुणाईमध्ये टॅटू किंवा पिअर्सरिंग करण्याचा ड्रेंट फार प्रमाणात दिसून येत आहे. फॅशनचाच एक भाग असलेल्या टॅटू आणि पिअर्सरिंगमुळे आपण अधिकच खुलून दिसतो असे काहींचे मत असते. त्यासाठी अंगावर विविध ठिकाणी टॅटू किंवा पिअर्सरिंग केले जाते. परंतु सर्वांनाच टॅटू-पिअर्सरिंग केल्यावर त्याचा फायदा होतो असे नाही. काहींना असे केल्यानंतर विशिष्ट प्रकारची अॅलर्जी होण्याची देखील संभावना असतो.

त्यामुळे जर तुम्ही पावसाळ्यात टॅटू किंवा पिअर्सरिंग करण्याचा विचार करत असल्यास सावधानता बाळगा कारण हा फॅशन ड्रेंट तुमच्या आरोग्यावर बेतण्याची शक्यता फार असते. तसेच टॅटू किंवा पिअर्सरिंग केल्यानंतर त्याकडे लक्ष न दिल्यास तुम्ही आजाराला बळी पडू शकता. यामुळे पुढील गोष्टी टॅटू किंवा पिअर्सरिंग करण्यापूर्वी लक्षात ठेवा.

-जर तुम्ही पावसाळ्यात टॅटू किंवा पिअर्सरिंग केले असल्यास वारंवार बाहेर जाणे टाळा. यामुळे तुम्हाला एखादी अॅलर्जी होण्याची शक्यता असते.

-तर टॅटू काढलेल्या ठिकाणी मच्छर चावल्यास तेथे तुम्ही खाजवल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होते.

-खरतर टॅटू काढताना एका विशिष्ट पद्धतीच्या शाईचा वापर केला जातो. त्या शाईत काही केमिकल पदार्थ वापरले जाताता. या केमिकलची काही वेळेस अॅलर्जी होण्याची सुद्धा शक्यता असते.

(डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी हे आहेत 5 सोपे उपाय)

तर चुकीच्या पद्धतीने पिअर्सरिंग केल्यामुळे शरीराच्या संबंधित भागावर छिद्र दिसून येतात. त्यामुळे पावसाळ्यात चुकूसुद्धा पाणी या छिद्रांमध्ये गेल्यास जखम अधिक वाढण्याची शक्यता असते. काही कारणास्तव वाढलेल्या जखमेवर उपाय म्हणून मोठी सर्जरी सुद्धा करावी लागण्याची शक्यता असते.