Dev Uthani Ekadashi 2018: भारतात संपूर्ण वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. त्यामधील कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामधील देव उठनी किंवा देव प्रबोधिनी एकादशीचे खुप महत्व आहे. हिंदू परंपरेनुसार देव उठनी ही एकादशी सर्वात मोठी आणि फलदायी मानली जाते. तर आज 19 नोव्हेंबर रोजी ती आली आहे. या एकादशीचे महत्व थोडक्यात सांगायचे झाले तर, या दिवसाच्या आधी 4 महिने भगवान विष्णु समुद्रात झोपलेले असतात. मात्र या दिवशी विष्णु निद्रेतून जागे झाल्यानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते.
रुढीनुसार, या एकादशीचे व्रत केल्यास सर्व भक्तांचे पाप नष्ट होऊन स्वर्ग प्राप्ती होणार असल्याचे समजले जाते. तसेच या एकादशीच्या वेळी काही नियमांचे पालन करावे लागते. नाहीतर व्यक्तीला नुकसान होऊन तो पापाचा धनी मानला जातो. तर या दिवशी चुकूनसुद्धा ही कामे करु नका.
1. भाताचे सेवन करु नका
हिंदू धर्मातील प्रचलित परंपरेनुसार, वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींच्यावेळी भाताचे सेवन करु नये. यामुळे असे समजले जाते की, पुढचा जन्म हा सरपडणाऱ्या प्राण्याच्या रुपात होतो.त्यामुळे भाताचे सेवन या दिवशी करणे टाळा.
2. शारिरीक संबंधापासून दूर रहा
या दिवशी पूर्ण ब्रम्हचर्यामध्ये रहावे. तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची काम वासना न आणता संपूर्ण दिवस या एकादशीचे व्रत करावे.
3. दिवसा सोने वगळावे
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. तर दिवसा आणि रात्री सोने वर्जित मानले जाते. त्यामुळे सकाळी लवकर उठून भगवान विष्णुची पुजा करावी. तर राग येण्यापासून दूर रहावे.
4. दारु आणि मांसाहार करणे टाळावे
या उठनी एकदशीच्या वेळी दारु आणि मांसाहार करणे टाळावे. असे मानले जाते की, दारु आणि मांसाहार माणसाला अहंकाराच्या दिशेने घेऊन जातो. त्यामुळे अहंकार या दिवशी अंगी पडू नये म्हणून मांसाहार किंवा दारुचे सेवन करण्यापासून दूर राहवे.
5. खोटे बोलू नये
एकादशीचे व्रत हे भगवान विष्णुची पुजा आणि त्याच्याबद्दल असलेले प्रेम दर्शविले जाते. त्यामुळे या दिवशी व्यक्तीने खरे बोलावे. तर कोणाची चहाडी, चोरी, क्रोध आणि खोटे बोलणे यापासून दूरच रहावे.