Akash Ambani-Shloka Mehta Wedding: आकाश अंबानी- श्लोका मेहता यांच्या वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात; पहा Videos

Akash Ambani-Shloka Mehta Wedding: आकाश अंबानी- श्लोका मेहता यांच्या वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात; पहा Videos
Akash Ambani-Shloka Mehta Wedding Celebration | (Photo Credits: Instagram)

रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) याचा 9 मार्चला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. आकाश अंबानी आपली मैत्रिण आणि व्यावसायिक रशेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत (Shloka Mehta) विवाहबद्ध होणार आहे. या शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून जंगी सेलिब्रेशनलाही सुरुवात झाली आहे. विवाहसोहळ्यापूर्वी संगीत आणि मेहंदी सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यांना बॉलिवूड स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आकाश-श्लोका यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी सजले अंबानी हाऊस Antilia (Videos)

शाही विवाहसोहळ्यातील सेलिब्रेशनला सुरुवात झाली असून याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तुम्हीही पहा सेलिब्रेशनचे काही व्हिडिओज....

यापूर्वी 6 मार्चला श्लोका-आकाशसह संपूर्ण परिवाराने अन्नसेवा केली. तर आकाश-श्लोकाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन स्विर्झरलँडला पार पडले. या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूडच्या स्टार्सने उपस्थिती लावली. आमिर खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सोनम कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा यांसारख्या स्टार्सने आपल्या डान्स परफॉर्मन्सने सोहळ्यात रंगत आणली.

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा शाही विवाहसोहळ्याला 9 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजता सुरुवात होईल. तर 11 मार्चला ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.