Mountaineer Santosh Yadav, Mohan Bhagwat (PC -Wikipedia, PTI)

RSS Dasara Melava: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh) नागपूर (Nagpur) येथील वार्षिक विजयादशमी उत्सवात (Annual Vijayadashami Utsav) प्रसिद्ध गिर्यारोहक संतोष यादव (Mountaineer Santosh Yadav) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. RSS ने आपल्या 97 वर्षांच्या अस्तित्वात पहिल्यांदाच एका महिला प्रमुख पाहुण्याला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. RSS ची स्थापना 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी, RSS प्रमुख लाखो स्वयंसेवकांसमोर सार्वजनिक भाषण करतात. ज्यामध्ये RSS साठी वर्षभराच्या दृष्टीकोनाची रूपरेषा ठरवली जाते.

दरम्यान, 54 वर्षीय संतोष यादव एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला आहे. मूळच्या हरियाणाच्या असणाऱ्या यादव यांना 2000 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांत, RSS ने दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी, HCL संस्थापक शिव नाडर, शास्त्रज्ञ व्ही के सारस्वत आणि दलित द्रष्टा निर्मल बाबा यांसारख्या व्यक्तिमत्त्वांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित केले आहे. (हेही वाचा - PM Narendra Modi's Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार 2 ग्रॅम सोन्याची अंगठी)

काँग्रेस नेते राहुल गांधींसह आरएसएसच्या टीकाकारांनी अनेकदा आरएसएसवर 'पुरुष वर्चस्व' असल्याचा हल्ला चढवला आहे. पुरुषांचा सहभाग असल्याने संघावर अनेक राजकीय पक्षांकडून निशाणा साधला जातो. त्यामुळे आरएसएसच्या प्रतिमेला बदलण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संतोष यादव यांना निमंत्रण दिल्याचं म्हटलं जात आहे.

कोण आहेत संतोष यादव?

संतोष यादव या भारतातील गिर्यारोहक आहे. माऊंट एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला आहेत. मे 1993 मध्ये त्यांनी एव्हरेस्टवर चढाई करण्यात यश मिळवले. संतोष यादव यांचा जन्म जानेवारी 1969 मध्ये हरियाणातील रेवाडी जिल्ह्यात झाला. त्यांनी महाराणी महाविद्यालय जयपूर येथून शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसात पोलीस अधिकारी आहेत. 2000 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.