Man Brutally Assaults Woman Video: जिम ट्रेनरकडून महिलेला बेदम मारहाण, आरोपीला अटक, पश्चिम बंगालची घटना
Man Brutally Assaults Woman PC TWITTER

Man Brutally Assaults Woman VIDEO: पश्चिम बंगालच्या राणाघाट जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जिममधील जिम ट्रेनर महिलेला बेदम मारहाण करत आहे. जिममधील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बॉडीलॅब पॉवर जिममध्ये ही घटना घडली आहे. जिम ट्रेनर महिलेला का मारहाण करत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. या  घृणास्पद घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- कल्याणमध्ये 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; 72 वर्षीय बेकरी मालकाला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर अर्धनग्न अवस्थेत होता. जिममध्ये कोणी नसताना त्यांने पीडित महिलेला मारहाण केल्याचे दिसत आहे. पीडित महिलेला सुरुवातीला बुक्कीने मारलं त्यानंतर ती पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तीला जमीनीवर ओढलं तिच्या चेहऱ्यावर आणि पोटावर लाथा आणि ठोसे मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महिला मदतीसाठी ओरडत असते पंरतु कोणीची तीची मदत करण्यासाठी पुढाकार घेत नाही.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिम ट्रेनरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला तर एका युजर्संनी म्हटलं की, जिम ट्रेनरवर लवकर कारवाई करा. आरोपीवर जिल्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई देखील सुरु करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांनी पीडित महिलेशी संपर्क साधला असून तीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत आहे. पीडितेला का मारहाण केली हे अद्याप समोर आले नाही. त्यामुळे पोलिस या संदर्भात चौकशी करत आहे. या व्हिडिओनंतर जिममध्ये महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.