Thane Shocker: कल्याणमध्ये 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; 72 वर्षीय बेकरी मालकाला अटक
Minor Rape Case (Photo Credit- Pixabay)

Thane Shocker: ठाणे (Thane) जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी 72 वर्षीय बेकरी मालकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. पीडित तरुणी कल्याण परिसरात असलेल्या बेकरीच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गेली असताना 30 एप्रिल रोजी सायंकाळी ही घटना घडली, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला दुकानात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या गुन्ह्याची माहिती मुलीच्या पालकांना दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने पीडितेला दिली. मुलीने नंतर या घटनेची माहिती तिच्या पालकांना दिली, ज्यांनी नंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यासंदर्भात कल्याणमधील एमएफसी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने माहिती दिली. (हेही वाचा -Minor Girl Rape Case: शेजारच्याने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक)

पोलिसांनी 1 मे रोजी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. शनिवारी 72 वर्षीय बेकरी मालकाला अटक करण्यात आली. (वाचा -Bhopal Rape Case: भोपाळमधील एका प्रसिद्ध शाळेच्या वसतिगृहात निष्पाप चिमुरडीवर बलात्कार)

ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. ठाणे येथील एका खाजगी शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनींचा सहलीदरम्यान विनयभंग करण्यात आला होता. त्यानंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (SCPCR) या प्रकरणाची चौकशी केली होती. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, ही कथित घटना 20 फेब्रुवारी रोजी घाटकोपरमधील थीम पार्कमधून विद्यार्थी परतत असताना घडली. कंत्राटी ट्रॅव्हल एजन्सीने नियुक्त केलेल्या एका बस अटेंडंटने लहान मुलांना स्नॅक्स पुरवताना विद्यार्थिंनीच्या प्रायव्हेट भागांना हात लावला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती.