झारखंडच्या (Jharkhand) गोड्डा (Godda) जिल्ह्यात रंगांचा सण असतानाच होळीला रंग लावण्यास नकार देणं एका महिलेला इतकं महागात पडलं की तिला जीव देऊन त्याची किंमत चुकवावी लागली. बलबड्डा पोलीस ठाण्याच्या (Balbadda Police Station) हद्दीतील अमूर नीमा गावात पप्पू मंडल, ललित मंडल, सुभाष मंडल, रणजित मंडल, हिरालाल मंडल आणि नीलम देवी यांनी दारूच्या नशेत बुची देवी या 64 वर्षीय महिलेच्या घरात प्रवेश केला. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात इतर महिलांना बळजबरीने रंग लावण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
दुसरीकडे घरात उपस्थित महिलांनी गुंडांना रंग देण्यास नकार दिल्याने आरोपींनी चिडून वृद्ध महिलेला उचलून जमिनीवर फेकले आणि महिलेला लाथ मारून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. महिलेला जीवे मारल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. रंग लावण्यास नकार दिल्याने एका वृद्ध महिलेची गुंडांच्या जमावाने हत्या केल्याची बातमी संपूर्ण गावात आगीसारखी पसरली. हेही वाचा Watch: चार वर्षांच्या मुलीला भटक्या बैलाने दिली टक्कर; पायदळी तुडवले, प्रकृती चिंताजनक
घटनेची माहिती मिळताच बलबड्डा पोलीस ठाण्याचे पोलीस अमूर नीमा गावात पोहोचले, त्यांनी मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. मृत बुची देवी यांचा मुलगा मुरारी सिंह याच्या जबानीवरून पप्पू मंडल, ललित मंडल, सुभाष मंडल, हिरालाल मंडल, रणजित मंडल आणि नीलम देवी यांना हत्येचा आरोप करण्यात आला आहे.
वृध्द महिलेच्या हत्येतील आरोपींना पकडण्यासाठी बलबड्डा पोलीस ठाण्याचे पोलीस संभाव्य ठिकाणी छापे टाकत असून, सध्या हत्येतील सर्व आरोपी फरार आहेत. मृत वृद्ध महिला बुची देवी हिच्या कुटुंबीयांनी ही हत्या मॉब लिंचिंग असल्याचे सांगत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी पोलिस आणि प्रशासनाकडे केली आहे. हेही वाचा Rajasthan: महिला न्यायाधीशाच्या प्रतिमा मॉर्फ करुन धमकी देत २० लाख रुपयांची मागणी
बलबड्डा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हत्येचा विविध पैलूंचा तपास सुरू केला असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांचीही या हत्येसंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. मृतकाच्या मुलाने पोलिसांसमोर सांगितले असले तरी मृताचा किंवा त्याच्या कुटुंबाचा कोणाशीही वाद नव्हता.