Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

Ashim Banerjee Passed Away: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee's) यांचे छोटे भाऊ असीम बॅनर्जी (Ashim Banerjee) यांचे आज कोरोनामुळे (Coronavirus) निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांच्यावर कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांनी याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष आलोक रॉय यांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. (वाचा - Shocking! मध्यरात्री घरात घुसून कोरोना बाधित महिलेवर नराधमांनी केला सामूहिक बलात्कार; अशक्तपणामुळे पीडितेला करता आला नाही प्रतिकार)

पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, राज्यात कोरोना विषाणूची एकूण 1,31,792 सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत, कोरोनामुळे 12,993 लोक मरण पावले आहेत आणि जवळपास 950017 लोक बरे झाले आहेत.

पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाच्या वाढती प्रकरणे लक्षात घेता मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 16 मे ते 31 मे या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.