Pamela Goswami Arrested: पश्चिम बंगालमध्ये भाजप युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी (Pamela Goswami) यांना 100 ग्रॅम कोकेनसह (Cocaine) अटक करण्यात आली आहे. पामेलासह तिचा मित्र प्रवीर कुमार डे यालादेखील अटक करण्यात आली आहे. जेव्हा कारमध्ये कोकेन सापडली त्यावेळी हे दोघे एकाच कारमध्ये होते. कोकेनसह भाजप नेत्याच्या अटकेवरून सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली आहे. लोक विविध मीम्सच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करीत आहेत.
पामेला आपल्या कारमध्ये कोकेन घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कोलकाताच्या न्यू अलीपूर भागात पोलिसांनी पामेलाच्या कारची झडती घेतली असता वाहनात ठेवलेल्या बॅगमधून 100 ग्रॅम कोकेन सापडले. यानंतर तिला अटक करण्यात आली. (वाचा - Electric Vehicles: सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करावा- मंत्री नितीन गडकरी)
अटकेच्या वेळी पामेला गोस्वामी सोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान होते. पोलिस सध्या पामेलावर विचारपूस करत आहेत. पामेला यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. बाजारात या औषधाची अंदाजित किंमत कोट्यवधी रुपये सांगितली जात आहे.
पामेला गोस्वामी कोण आहेत?
पामेला या भाजपा युवा मोर्चाशी संबंधित आहेत. त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या बंगाल युनिटच्या सरचिटणीस आहेत. पामेला आपल्या सोशल मीडियावर भाजपच्या मेळाव्यांची छायाचित्रे अपलोड करत असतात. पामेला या अनेकदा भाजपा नेत्यांसमवेत प्रचार करताना दिसल्या आहेत.