Virar: विरार येथे मद्यधुंद महिलांनी घातला गोंधळ, पोलिस अधिकाऱ्यांना घेतला चावा

Virar: विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार पश्चिम येथील गोकुळ टाऊनशिपमधील एका बारमध्ये तीन महिलांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून चावा घेतल्याचा आरोप आहे. या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारमधील एका रेस्टॉरंट बारमध्ये तीन महिला दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वंजारी, इतर पोलीस अधिकारी आणि हवालदार घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्या महिलांनी पोलिसांशीही गैरवर्तन केले. एवढेच नाही तर एका महिलेने पोलिस अधिकाऱ्याची वर्दी हिसकावून त्याला ओढले. कॉलर काढत असताना महिलेने त्याला त्याच्या उजव्या मनगटावर आणि कोपरावर चावा घेतला.