Vande Bharat Express Trial Run Video: भारतीय रेल्वेला मोठे यश मिळाले आहे. सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) ने ट्रायल रनमधील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वंदे भारत ट्रायल रनमध्ये 180 किमी प्रतितास वेगाने धावली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्रायल रनचा व्हिडिओ शेअर केला आहे.
कोटा-नागदा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे. ट्रेन 180 किमी/तास वेगाने धावली. वंदे भारतमध्ये एक अद्भुत संतुलन आहे. व्हिडिओमध्ये पाण्याने भरलेला ग्लास दिसत आहे. या ट्रेनमध्ये 180 किमी वेगानेतही काचेचा ग्ला जागेवरून हालत नाही, हे स्पष्ट दिसत आहे. (हेही वाचा - Student Union Election in Rajasthan: विद्यार्थी संघटना निवडणुकित मतं मिळवण्यासाठी विद्यार्थी नेते पडत आहेत मुलींच्या पाया; Watch Viral Video)
Superior ride quality.
Look at the glass. Stable at 180 kmph speed.#VandeBharat-2 pic.twitter.com/uYdHhCrDpy
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 26, 2022
वंदे भारतची ट्रायल रन रिसर्च, डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) च्या टीमच्या देखरेखीखाली झाली. वंदे भारत 16 डब्यांसह 180 किमी प्रतितास वेगाने धावली. कोटा विभागात वंदे भारतच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याची पहिली चाचणी कोटा आणि बारना, दुसरी चाचणी बारणा आणि कोटा, तिसरी चाचणी कुर्लासी आणि रामगंज मंडी दरम्यान, चौथी आणि पाचवी चाचणी कुर्लासी आणि रामगंज मंडी दरम्यान, सहावी चाचणी कुर्लासी आणि रामगंज मंडी दरम्यान पूर्ण झाली आहे.
आत्मनिर्भर भारत की रफ़्तार… #VandeBharat-2 at 180 kmph. pic.twitter.com/1tiHyEaAMj
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 26, 2022
दरम्यान, वंदे भारत ही स्वदेशी ट्रेन असून ती सेमी हायस्पीड ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेनला वेगळे इंजिन नाही. यात स्वयंचलित दरवाजे आणि एअर कंडिशनर चेअर कार कोच आणि रिव्हॉल्व्हिंग चेअर आहे. ही खुर्ची 180 अंशांपर्यंत फिरू शकते. ट्रेनमध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट देखील आहेत.