Uttar Pradesh Man Gets Bitten By Snake 6 Times: उत्तर प्रदेशातील तरुणाला 35 दिवसांत सहा वेळा चावला साप; पुढे काय झालं? जाणून घ्या
Snakes | Image Used for representational purpose only । (Photo Credits: Pixabay)

Uttar Pradesh Man Gets Bitten By Snake 6 Times: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. विकास दुबे नावाच्या 24 वर्षीय तरुणाला 35 दिवसांत एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा साप चावल्याची (Snake Bites) धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विकास दुबे यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 2 जून रोजी विकास दुबे यांना त्यांच्या घरी अंथरुणात सापाने द्वंश केला. ही पहिलीच घटना होती. त्यानंतर विकासला शेजारच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि वैद्यकीय उपचार देण्यात आले. 2 जून ते 6 जुलै दरम्यान दुबे यांना सहा वेळा साप चावला.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, प्रत्येक वेळी सापाने हल्ला केल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचार करण्यात आले. बरे झाल्यानंतर ते स्वत: पायीच हॉस्पिटलमधून घरी गेले. चौथ्या सर्पदंशानंतर त्यांना घर सोडून दुसरीकडे राहण्याचा सल्ला देण्यात आला. काही दिवसांनी विकास राधानगर येथील त्यांच्या मावशीच्या घरी गेला. येथे गेल्यावर त्याला पुन्हा पाचव्यांदा चावाने द्वंश केला. (हेही वाचा - World's Largest Snake Found Dead: ॲना ज्युलिया नावाचा जगातील सर्वात मोठा साप Amazon Rainforest मध्ये मृतावस्थेत सापडला)

त्यानंतर तो पुन्हा त्याच्या घरी परतला. परंतु, 6 जुलै रोजी त्याला पुन्हा साप चावला. त्याच्या प्रकृतीच्या चिंतेने त्याच्या पालकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. सध्या विकासची प्रकृती पूर्णपणे बरी आहे. (हेही वाचा - Viral Video: गाढ झोपलेल्या महिलेच्या केसात साप रेंगाळताना दिसला, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क)

विकास दुबे यांनी सांगितले की, साप चावण्यापूर्वी त्यांना नेहमीच पूर्वकल्पना होती. तसेच जेव्हा-जेव्हा साप चावला त्यावेळी शनिवारी किंवा रविवार होता. विकास यांच्यासोबत घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.