Yogi Adityanath | (Photo Credits: Facebook)

Uttar Pradesh Govt on Love Jihad: उत्तर प्रदेश विधानसभेत बेकायदेशीर धर्मांतर विरोधात विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यासोबतच अनुसूचित जाती-जमातील मुलीचे फसवूण विवाह आणि धर्मांतर करणाऱ्यांना आता जन्मठेपेची शिक्षा(Life Imprisonment) होणार आहे. त्याशिवाय लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमातील मुलींसोबत फसवूण लग्न करणे. त्यांचे धर्म परिवर्तन(conversion) करणे अशा प्रकरणांमध्ये आरोपींना आता जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतर बंदी (दुरुस्ती) विधेयक मंगळवारी उत्तर प्रदेश विधानसभेत मंजूर करण्यात आले. विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. (हेही वाचा:Love Jihad Cases in Maharashtra: बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींच्या चौकशीत मोठ्या संख्येने आढळली 'लव्ह जिहाद'ची प्रकरणे- Devendra Fadnavis )

उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी विधानसभेत हे विधेयक मांडले होते. राज्य सरकारने यापूर्वी विधानसभेत धर्म परिवर्तन बंदी विधेयक, 2021 मंजूर केले होते. या विधेयकात एक ते दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद होती. या दुरुस्तीद्वारे शिक्षा आणि दंडाच्या बाबतीत पूर्वीचे विधेयक अधिक मजबूत करण्यात आले आहे. नवीन तरतुदींनुसार अल्पवयीन, अपंग किंवा मतिमंद व्यक्ती, महिला, एससी-एसटीचे धर्मांतर केल्यास दोषीला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे सामुहिक धर्मांतर केल्यास जन्मठेप आणि एक लाख रुपयांचा दंडही होऊ शकतो.