Uttar Pradesh Crime: चुलत भावाची निर्घृण हत्या, दुचाकीला बांधून गावाभर फरफटत नेलं, व्हिडिओ व्हायरल
Uttar Pradesh Crime PC Twitter

Uttar Pradesh Crime:  उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी पीडीत तरुणाला दुचाकीने बांधून फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पूर्व वैमनस्यातून तरूणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा- गोव्यातील हॉटेल मॅनेजरने पत्नीला समुद्रात बुडवले; हत्येला अपघात दाखवण्याचा प्रयत्न)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी २० जानेवारीच्या रात्री हल्लेखोरांनी पीडितेला दुचाकीवर बांधून फरफटत नेले आहे. मेंहदी हसन असं मृत तरुणाचे नाव असून तो बरौली गावातील रहिवासी होता. तर अनूज आणि नितीन अशी आरोपींची नावे आहे. आरोपी हे मृत तरुणाचे चुलत भाऊ आहेत. या घटनेनंकर बरौला गावात खळबळ उडाली आहे.शनिवारी रात्री अनूज आणि नितीन आणि मेंहद यांच्या जोरात वाद झाला होता. कोणत्या कारणावरून वाद झाला हे अद्याप समोर आले नाही.  त्यानंतर भांडण सुरु करत हसनवर चालून हल्ला केला.या घटनेत मेंहद हा जखमी झाला त्यानंतर त्याला दुचाकीवर बांधले आणि गावात फरफटत नेलं.

त्यानंतर मेहंदीला दुचाकीवरून ओढून पोलिस ठाण्यात आणले. हे पाहून पोलिसही चक्रावले. घटनास्थळी जमाव जमाल आणि त्यांनी पीडितेची सुटका करत त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  मेहंदीने 2018 मध्ये अनुजच्या वडिलांवर चाकूने वार केले होते आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेहंदीविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून अनुजला त्याच्याबद्दल राग होता आणि त्यांच्यात न्यायालयात अनेक वाद झाले होते अशी माहिती चौकशीतून समोर येत आहे.