Yogi Adityanath, Akhilesh Yadav (Photo Credit - ANI)

Uttar Pradesh By Poll Result 2020: उत्तर प्रदेशच्या 7 विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, यूपीमधील विधानसभा जागांपैकी भाजपा 5- ते 6 जागा जिंकू शकते. दुसरीकडे समाजवादी पक्षाला 1 ते 2 विधानसभा जागा मिळू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ७ जागांवर आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 3 नोव्हेंबरला विधानसभेच्या 7 जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. यात पश्चिम उत्तर प्रदेशचे फिरोजाबादच्या टूंडला, अमरोहाचा नौगांव, कानपूर नगरातील घाटमपूर, उन्नावरचा बांगरमऊ, जौनपुरमधील मल्हनी आणि देओरिया यासह बुलंदशहर या सात मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या सात जागांवरील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांबरोबरच उत्तर प्रदेशच्या सात विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीचे निकालही आज समोर येतील. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कायम राहील की नाही, याचा निकाल स्पष्ट होईल. (हेही वाचा - Bihar Assembly Elections Results 2020 Live News Updates: बिहार विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणीला 8 वाजता होणार सुरूवात)

एक्झिट पोलच्या निकालांनुसार, भाजप यूपीच्या उपांत्य फेरीत विजयी होताना दिसत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, यूपीमधील सात विधानसभा जागांपैकी भाजपा पाच-सहा जागा जिंकू शकते. दुसरीकडे समाजवादी पार्टी 1 ते 2 विधानसभा जागांवर विजय मिळवू शकते. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात भाजपाला 37 टक्के मते मिळाली आहेत. तसेच राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला (सपा) 27 टक्के मते मिळाली आहेत.