UP Shocker: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात शेतात कीटकनाशक फवारणी करून घरी पोहोचल्यानंतर हात न धुता खाल्ल्यामुळे एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. स्टेशन हाऊस ऑफिसर रंजना सचान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया (वय २७, रा. महावन शहर) शनिवारी शेतात कीटकनाशक फवारणी करून घरी येताच जेवायला बसला आणि लागला. जेवण केल्यानंतर त्याला झोप येऊ लागली आणि घरच्यांना काही समजण्याआधीच त्याची प्रकृती बिघडू लागली. हेही वाचा: Maharashtra: बीड आणि धुळ्यात मंत्र्यांच्या उपस्थितीत दोघांनी आत्मदहनाचा केला प्रयत्न
कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.