देशात तिहेरी तलाक विरोधात कायदा लागू करण्यात आला आहे. तरीही तिहेरी तलाक देण्याचे प्रकार थांबवलेले नाही. तर युपी मधील एका विवाहित महिलेला तिसरी सुद्धा मुलगी झाली यावरुन नवऱ्याने तिहेरी तलाक दिल्याची घटना घडली आहे. तसेच तलाक दिल्यानंतर नवऱ्याने बायकोला भर रस्त्यात सोडून पळ काढला आहे.
पीडित महिलेचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले असून तिला दोन मुली आहेत. मात्र नवऱ्याला तिसरा मुलगा पाहिजे होता. परंतु मुलगा झाला नाही म्हणून बायकोला तिसऱ्या वेळेस ही मुलगी झाली. यामुळे संतापलेल्या नवऱ्याने बायकोला तिहेरी तलाक दिला आहे.(दिल्ली: नशेच्या अवस्थेत गाडी चालवणाऱ्या तरुणाला ट्रॅफिक पोलिसांनी आकारला भला मोठा दंड; तरुणाने चिडून बाईकच पेटवली Watch Video)
पीडित महिलेने अलीगढ येथील पोलीस स्थानकात नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. महिलेने पोलिसांना कोणत्या कारणावरुन नवऱ्याने तलाक दिला आहे याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मुलगा झाला नाही म्हणून नवऱ्याने भर रस्त्यात मारहाण सुद्धा केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असून कायद्यानुसार नवऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.