दिल्ली: तिहार तुरुंगातील टॉयलेटमध्ये कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
Image used for Representational Purpose only (Photo Credits: PTI)

दिल्लीमधील (Delhi) तिहार तुरुंगाच्या (Tihar Jail) टॉयलेटमध्ये एका कैद्याने (Prisoner) गळफास घेऊन आत्महत्या (Prisoner Commit Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गगन, असं या कैद्याचं नाव आहे. गगनला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गगन तिहार तुरुंगाच्या 3 नंबरच्या कोठडीत बंद होता.

आज सकाळी 10 वाजता गगनने तिहार तुरुंगातील टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे तिहार तुरुंगात खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉक्टरांनी गगनला मृत घोषित केलं. अद्याप गगनच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर गगनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयाकडे सोपविण्यात येणार आहे. (हेही वाचा - औरंगाबाद: भाजप कार्यकर्त्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितलं 'हे' धक्कादायक कारण)

तिहार तुरुंगामध्ये मागील वर्षी ऑगस्टमध्ये एका कैद्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. चंद्रभान, असे या कैद्याचे नाव होते. चंद्रभानवर खुनाचा आरोप होता. त्यावेळीदेखील चंद्रभानच्या आत्महत्येचे नेमकं कारण समजू शकलं नव्हतं. तसेच आज सकाळी घडलेल्या घटनेमुळे तिहार तुरुंगात एकच खळबळ उडाली होती. तिहार पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.