केरळमधील मदुराई येथे अनधिकृत इमारती जमीनदोस्त; पहा व्हायरल व्हिडिओ
Unauthorized Buildings Demolished in Madurai (PC- ANI)

केरळमधील (Kerala) मदुराई (Madurai) येथे अनधिकृत इमारती (Unauthorized Buildings) जमीनदोस्त (Demolished) करण्याचे काम सुरू आहे. शनिवारी येथील H2O हॉली फेथ अपार्टमेंट टॉवर स्फोटकं लावून पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इमारती पाडण्याचे काम सुरू असल्याने या भागाच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

रविवारीदेखील अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याचे काम चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने आज सकाळी 11 वाजल्यापासून इमारती पाडण्यास सुरुवात केली. (हेही वाचा - उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे ट्रक-बसच्या धडकेत 20 जणांचा मृत्यू, तर 21 जण जखमी)

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये मदुराईमधील H2O हॉली फेथ, अल्फा सीरेन, जैन कोरल कोव आणि गोल्डन कायालोरम या अनधिकृत इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व इमारती आज आणि उद्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.