UN World Happiness Report 2019: संयुक्त राष्ट्र संघाने नुकतीच आपली जागतिक आनंदी देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये यावर्षी भारताला 140 वे स्थान प्राप्त झाले आहे. आश्चर्य म्हणजे या यादीमध्ये पाकिस्तान 67 व्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी भारत या यादीमध्ये 133व्या क्रमांकावर होता, मात्र या वर्षी भारताची 7 अंकांनी घसरण झाली आहे. फिनलँड (Finland) सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्र ही सूची 6 घटकांच्या आधारावर निश्चित करते. यामध्ये उत्पन्न, निरोगी जीवन, सामाजिक अहवाल, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारतेचा समावेश आहे.
जगातील 156 देशांना या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. फिनलँडनंतर डेन्मार्क, नॉर्वे, आयलँड आणि नेदरलँड या देशांचा नंबर लागतो. भारताच्या शेजारील देशांविषयी बोलायचे झाले तर इतक्या समस्या असूनही पाकिस्तान 67 व्या स्थानी, चीन 93 व्या स्थानी आणि बांगलादेश 125 व्या स्थानी आहे. अमेरिका या यादीमध्ये 19 व्या स्थानी आहे. (हेही वाचा: CMIE अहवाल: भारतात रिकाम्या हातांची संख्या वाढली, 2016 नंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक)
सर्वात नाखूष आणि उदास असलेल्या देशांमध्ये दक्षिण सुदानचा नंबर लागतो. त्यानंतर मध्य अफ्रिकन गणराज्य (155), अफगाणिस्तान (154), टांझानिया (153) आणि रवांडा (152) या देशांचा समावेश होतो. या यादीवरून हे स्पष्ट होतो की, देशाकडे फक्त पैसा असून तिथले लोक समाधानी होत नाहीत तर त्या देशाने नागरिकांना बहाल केलेले अधिकार आणि सुविधा जनतेला खुश ठेवतात.