Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Ujjain Shocker: मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात लसूण पिकाचे रक्षण करणाऱ्या एका शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भाट पाचलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलोदा लाखा गावातील शेतकरी किशन सिंग हे सोमवारी रात्री आपल्या शेतात लसणाच्या पिकाची राखण करण्यासाठी गेले होते आणि मंगळवारी सकाळी ते घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय घाबरले.

कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता  किशन सिंग यांच्या  डोक्यातून रक्तस्त्राव होत होता  आणि शरीराच्या इतर भागावर जखमा असल्याचे कुटुंबीयांनी  पाहिले. कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या हत्येत त्याच्या जवळच्या नातेवाईकांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किशनसिंग यांच्या इतर नातेवाईकांचीही त्यांच्या शेताजवळ शेतं आहेत.

यावेळी लसणाचे पीक चांगले आले असून त्यांना भावही चांगला मिळू शकेल, अशी आशा लोकांना वाटत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरीही लसूण पिकाची काळजी घेत आहेत. अनेक शेतांवर शेतकऱ्यांनी खासगी एजन्सीचे सुरक्षा कर्मचारीही तैनात केले आहेत.