Youths Steal Petrol From Vehicles Parked at Girls' Hostel: भोपाळ (Bhopal) मध्ये शुक्रवारी दोन चोरट्यांनी सुमारे अर्धा डझन दुचाकींमधून पेट्रोल चोरले (Stolen Petrol). ही संपूर्ण घटना परिसरातील एका वसतिगृहात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फेमिना गर्ल्स हॉस्टेलमधील रिशिता तोमर नावाच्या मुलीने सांगितले की, मी कालच माझ्या स्कूटीच्या टाकीत 500 रुपये किमतीचे पेट्रोल भरले होते.
भोपाळच्या एमपी नगर झोन 1 मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. फेमिना गर्ल्स हॉस्टेलमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे चोरटे वाहनांचे कुलूप तोडून पेट्रोलची चोरी करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी आधी वाहनांचे कुलूप तोडले, त्यानंतर वसतिगृहाबाहेर उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांमधून तसेच परिसरातील इतर ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांमधून पेट्रोल चोरले. (हेही वाचा - Lab Technician Steal Plasma: जयपूर रुग्णालयातून सोने-चांदी नव्हे तर प्लाझ्माच्या 70 युनिटची चोरी; लॅब टेक्निशियनवर गुन्हा दाखल)
पहा व्हिडिओ -
#WATCH | #Bhopal: Youths Steal Petrol From Vehicles Parked At Multiple Spots, Including Girls Hostel In Zone-1 MP Nagar On Friday Night#MadhyaPradesh #MPNews @Rishita124 pic.twitter.com/MWObRoZ1PW
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) July 20, 2024
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील इतर ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून गुन्हेगारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरात गस्त वाढवण्यात आली असल्याचंही पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.