Mukesh Ambani Receives Threatening Emails: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना आणखी दोन ईमेल धमक्या (Threatening Emails) आल्या असून, 400 कोटी रुपये न भरल्यास त्यांना संपवण्याची धमकी दिली आहे. ईमेल पाठवणारा एकच व्यक्ती असल्याचा संशय आहे, ज्याने यापूर्वी वेगवेगळ्या प्रसंगी तीन धमकीचे ईमेल पाठवले होते. ईमेल पाठवणाऱ्याने 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी ईमेल पाठवले आहेत. मागील ईमेलमध्ये नमूद केलेल्या 400 कोटी रुपयांच्या खंडणीची रक्कम आरोपीने बदललेली नाही.
गावदेवी पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. अंबानींना कंपनीच्या ईमेल आयडीवर धमकीचे ईमेल प्राप्त झाले. शादाब खान असं या ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्याने अंबानींना पाठवलेल्या ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, "जर तुम्ही (अंबानी) आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत." (हेही वाचा - Mukesh Ambani यांनी खरेदी केली 13 कोटींची नवीन Rolls Royce SUV; व्हीआयपी नंबरसाठी खर्च केले 'एवढे' रुपये)
तपास यंत्रणांनी आरोपीला पकडण्यासाठी तपास सुरू केला असून अंबानी यांनी शनिवारी दुसऱ्या धकमीच्या ईमेलसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दुसऱ्या ईमेलमध्ये, प्रेषकाने आरोप केला की, तक्रारदार पहिल्या ईमेलवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरल्याने त्याने पुन्हा धमकीचा मेल पाठवला. यात आरोपीने म्हटलं आहे की, मागण्या पूर्ण न झाल्यास, (अंबानींना) डेथ वॉरंट जारी केले जाईल.
दरम्यान, सोमवारी एका ईमेलमध्ये पाठवणाऱ्याने खंडणीची रक्कम 400 कोटी रुपयांपर्यंत वाढवली. अंबानी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिस ठाण्यात खंडणी आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. हे ईमेल दुसऱ्या देशातून पाठवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.