Two Brothers Killed in Elephant Attack (PC - Pixabay)

Two Brothers Killed in Elephant Attack: छत्तीसगड (Chhattisgarh) च्या जशपूर जिल्ह्यात (Jashpur District) आज पहाटे दोन भावंडांचा जंगली हत्तीने तुडवल्याने मृत्यू झाला. कोकडे (वय, 45) आणि पाडवा (वय,43) हे दोघे त्यांच्या मातीच्या घरात झोपले असताना तापकारा वन परिक्षेत्रातील केरसाई गावात ही घटना घडली. (Elephant Attack On Tourists Bus: प्रवाशांनी भरलेल्या बसवर हत्तीचा हल्ला, सोडेने उचलले वाहान (Watch Video))

प्राथमिक माहितीनुसार, पिडीतांपैकी एकाला रात्री हत्तीची उपस्थिती जाणवल्यानंतर जाग आली. हत्तीला पाहण्यासाठी तो बाहेर गेला. मात्र, हत्तीने त्याला आपल्या सोंडेने पकडून तुडवले. त्याला वाचवण्याच्या नादात त्याचा भाऊही मारला गेला. (हेही वाचा -Elephant Attack: चारा घालणाऱ्या महिलेवर हत्तीचा हल्ला (Watch Video))

या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. तापकरा परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून हत्तींचे कळप फिरत असून वन कर्मचारी आणि स्वयंसेवक त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. गावकऱ्यांना कळपांच्या स्थानाबद्दल वेळोवेळी माहिती दिली जाते. सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Elephant Attack Viral Video: अभयारण्यात रस्त्याच्या कडेला फोटो काढणाऱ्या पर्यटकांवर हत्तीचा हल्ला; धावत केला पाठलाग, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch))

राज्यात, विशेषतः उत्तरेकडील भागात मानव-हत्ती संघर्ष हे गेल्या एका दशकापासून चिंतेचे प्रमुख कारण होते. सुरगुजा, रायगड, कोरबा, सूरजपूर, जशपूर आणि बलरामपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असतात. वनविभागाच्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत राज्यात हत्तींच्या हल्ल्यात सुमारे 270 लोकांचा मृत्यू झाला आहे.