Petrol, Diesel Prices Today: आज पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल नाही, जाणुन घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol-Diesel | (Photo Credit: ANI)

नवीन वर्ष म्हणजे 2022 मध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जवळपास महिनाभरापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने रविवार 2 जानेवारी 2022 साठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. नवीन दरानुसार, आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 95.41 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तसेच मुंबईचा एक लिटर पेट्रोल दर 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार नव्या योजनेवर काम करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती खाली आणण्यासाठी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समन्वयाने भारत आपल्या धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे. (हे ही वाचा Bank Holidays 2022: नववर्षात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, ग्राहकांनो हे दिवस लक्षात ठेवा, कामे वेळेत आटोपा.)

तुमचे शहराचे दर येथे तपासा

मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर

दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर

चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर

कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर

दररोज 6 वाजता किंमत बदलते

आम्ही तुम्हाला सांगतो की पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.