Tirumala Tirupati Devasthanam: तिरुपती देवस्थानाला केसांच्या विक्रीतून 126 कोटी, लाडू प्रसादातून होणार 365 कोटीची कमाई
Tirupati Temple | Image Used for Representational Purpose (Photo Credit: PTI)

तिरुपती, (Tirupati) आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) मोठ श्रद्स्थान आहे. तिरुपती देवस्थानने (TTD) ने (Tirumala Tirupati Devasthanams) गुरुवारी 2022-23 साठी आपला अर्थसंकल्प सादर केला. तिरुमलाच्या प्राचीन भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या प्रशासकीय मंडळाने 2022-23 च्या वार्षिक बजेटमध्ये 3,096.40 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय बैठकीत पुढील 12 महिन्यांच्या आर्थिक योजनेचा आढावा घेतल्यानंतर, TTD बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी आणि कार्यकारी अधिकारी के.एस. जवाहर रेड्डी यांनी माध्यमांना सांगितले की, बोर्डाने वार्षिक बजेटला मंजुरी दिली आहे.

'लाडू प्रसाद'च्या विक्रीतून 365 कोटी

मंदिराच्या वार्षिक उत्पन्नापैकी सुमारे 1,000 कोटी रुपये भक्तांकडून पवित्र 'हुंडी' (दान-पाट) मध्ये येण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांमधील ठेवींवर सुमारे 368.5 कोटी रुपये व्याज मिळतील. तसेच विविध तिकिटांच्या विक्रीतून 362 कोटी रुपये आणि ‘लाडू प्रसादम’च्या विक्रीतून 365 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज बजेटमध्ये आहे.

याशिवाय टीटीडीला (TTD) निवास आणि विवाह हॉलच्या भाड्यातून 95 कोटी रुपये आणि भाविकांनी अर्पण केलेल्या केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपये मिळतील अशी अंदाज आहे. त्याच वेळी, मंडळाचा विविध सेवांवर 1,360 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

म्हणुन भक्त केस दान करतात

तिरुपती बालाजी मंदिराबाबत असे मानले जाते की जो भाविक येथे येऊन केस दान करतो, त्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्याचे सर्व संकट संपते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी सर्व पाप आणि दुष्कृत्यांचा त्याग करणाऱ्या व्यक्तीचे सर्व दु:ख दूर करते. म्हणून येथे लोक आपले केस सर्व वाईट आणि पापांच्या रूपात सोडतात. दररोज सुमारे 20 हजार लोक तिरुपती मंदिरात केस दान करून जातात. हे काम पूर्ण करण्यासाठी मंदिर परिसरात सुमारे सहाशे नाई ठेवण्यात आले आहेत.