Arvind Kejriwal | PTI

Arvind Kejriwal Death Threate: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Delhi CM Arvind Kejriwal)यांना जीवे मारण्याच्या धमकी(Death Threate)चा संदेश लिहिणाऱ्या आरोपीला अखेर दोन दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. पटेल नगर मेट्रो स्थानकावर धमकीचा संदेश लिहिण्यात आला होता. त्या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी अंकित गोयल (33) याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या मेट्रो युनिटने या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस करत होते. आता पोलिसंनी आरोपी अंकित गोयल याला अटक केली आहे. (हेही वाचा: Arvind Kejriwal भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलनासाठी आप नेत्यांसह रवाना (Watch Video))

आप ने या प्रकरणी फोटो एक्स वर ट्विट केला होता. ‘आप’ने दिल्ली मेट्रोतील फोटो शेअर केला असून केजरीवाल यांचा जीव धोक्यात असल्याचे म्हटले होते. भारतीय जनता पक्ष केजरीवाल यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला होता. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला भाजप आणि नरेंद्र मोदी जबाबदार असतील, असा इशारा ‘आप’ने भाजपला दिला आहे.

‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून भाजप चिंतेत आली आहे. भाजप केजरीवाल यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचे षडयंत्र रचत आहे. हे सगळे षडयंत्र पीएमओ कार्यालयातून रचले जात आहे, असे आरोप संजय सिंह यांनी केले होते.

पोस्ट पहा: