JET Fuel Prices Hike: जेट इंधनाच्या किमती 0.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यंदाची ही सलग आठवी वाढ आहे. सध्या, जेट इंधन आतापर्यंतच्या सर्वोच्च किंमतीला विकले जात आहे. जागतिक ऊर्जेच्या किमतीत वाढ झाल्याने जेट इंधन महागले आहे. एटीएफचा वापर विमानात केला जातो.
सरकारी इंधन किरकोळ विक्रेत्यांच्या किमतीच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय राजधानीत एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) ची किंमत 277.5 रुपये प्रति किलो किंवा 0.2 टक्क्यांनी वाढून 1,13,202.33 रुपये प्रति किलो (113.2 रुपये प्रति लिटर) झाली आहे. त्याचवेळी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांची विक्रमी वाढ झाल्यानंतर सलग 10 व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी 22 मार्चपासून 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनेकवेळा 10 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. (हेही वाचा - Power Shortage in India: बिहार-झारखंडसह अनेक राज्यांमध्ये 'ब्लॅक आऊट' होण्याची शकता; महाराष्ट्रात केवळ 6 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक)
दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला जेट इंधनाचे दर सुधारित केले जातात. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींच्या आधारे दररोज सुधारित केले जातात. यापूर्वी, 16 मार्च रोजी, एटीएफच्या किमतीत 18.3 टक्के (रु. 17,135.63 प्रति किलोलिटर) इतकी तीव्र वाढ झाली होती. शिवाय, 1 एप्रिल रोजी 2 टक्के (रु. 2258.54 प्रति किलोलिटर) वाढ करण्यात आली.
सध्या, मुंबईत ATF ची किंमत प्रति किलो 111,981.99 रुपये आहे, तर कोलकात्यात 117,753.60 रुपये आणि चेन्नईमध्ये 116,933.49 रुपये प्रति किलोलीटर आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आणि महामारीतून बाहेर पडल्यानंतर पुरवठा चिंतेमुळे जागतिक स्तरावर ऊर्जेच्या किमती वाढल्याने भारतात इंधनाचे दर वाढले आहेत. भारत कच्च्या तेलाची गरज पूर्ण करण्यासाठी 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.