Indian Railways: होळी निमित्त घरी जाणाऱ्यांना रेल्वेचा मोठा दिलासा; 'या' विशेष रेल्वे गाड्या धावणार
Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

Indian Railways: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा फेऱ्यासह वेगवेगळ्या झोनमधून वेगवेगळ्या शहरांकडे धावणाऱ्या विशेष गाड्या धावण्याचा निर्णय घेतला आहे. अशातचं आता होळी निमित्त रेल्वेने घरी जाणाऱ्या लोकांसाठी दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वेने रेल्वेगाड्यांचा कालावधी मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होळीचा सण साजरा होणार आहे.

याशिवाय रेल्वेने काही साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचीही घोषणा केली आहे. उत्तर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 01 फेब्रुवारी 2021 पासून कालका-शिमला हेरिटेज हिल रेल विभागावर 2 विशेष गाड्या चालवणार आहे. ज्यामध्ये 04527/04528 कालका-शिमला-कालका शिवालिक एक्सप्रेस स्पेशल आणि 04529/04530 कालका-शिमला-कालका स्पेशल एक्सप्रेसचा समावेश आहे. (वाचा - Railway Recruitment 2021: रेल्वेत 561 पदांवर नोकर भरती, 10 वी पास असलेल्या उमेदवारांना ही करता येणार अर्ज)

पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांची मागणी लक्षात घेता विशेष जोड्यांच्या 12 जोड्यांच्या कामकाजाचा कालावधी मार्चपर्यंत वाढविण्यात आला असून यात दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यासह अनेक राज्यांना जोडणार्‍या रेल्वे गाड्यांचा समावेश आहेत.

याशिवाय तिरुपती-हजरत निजामुद्दीन 02781/02782 विशेष ट्रेन चालविल्या जात आहेत.

विशेष म्हणजे ज्या प्रवाशांकडे कंफर्म तिकिट असेल त्यांनाचं या ट्रेनमध्ये प्रवासास परवानगी असेल. प्रवासी पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅपद्वारे तिकिट बुकिंग करू शकतात. तसेच प्रवाशांना प्रवासादरम्यान सरकारने निश्चित केलेल्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक आहे.