Shocking! स्वत:ह कुटुंबातील चौघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले, नवऱ्याने सवत आणताच संतापलेल्या पहिल्या पत्नीकडून कृत्य
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Shocking! बिहारमध्ये नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नामुळे संतापलेल्या एका विवाहितेने एवढं भयानक पाऊल उचललं की, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं. जिवंत जळाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कुटुंबातील दोन जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. ही घटना सुपौल बाजारच्या शेखपुरा परिसरातील आहे.

पत्नीने शनिवारी सकाळी स्वत:सह कुटुंबातील चार जणांवर पेट्रोल शिंपडून पेटवून दिले. भाजल्याने महिला आणि सासूचा मृत्यू झाला, तर तिचा नवरा आणि सवत गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही प्रथम स्थानिक सीएचसीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेथून त्याला डीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले. डीएमसीएचमध्ये या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Crime: प्रेयसीला जातीय अपशब्द वापरून तिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी तरुणाला अटक)

मृतांमध्ये परवीन (वय, 35) आणि तिची सासू रुफैदा खातून (वय, 45) यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, शेखपुरा मोहल्ला येथील रहिवासी प्लंबर मिस्त्री खुर्शीद आलम यांचा 10 वर्षांपूर्वी गावातचं परवीनशी विवाह झाला होता. मुले नसल्यामुळे दोन वर्षांपूर्वी खुर्शीदने रोशनी खातूनसोबत शेजारच्या गावात लग्न केले. परवीन पहिल्यापासून दुसऱ्या लग्नाला विरोध करत होत्या. त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा तिने पती खुर्शीद यांना अनेकदा दिला होता. यापूर्वीही यावरून दोघांमध्ये अनेक वाद झाले होते.

दरम्यान, शनिवारी सकाळी परवीन यांनी स्वत:सह कुटुंबियांवर पेट्रोल टाकून आग लावली. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरू केला. या ठिकाणी अशा प्रकारची पहिलीच घटना घडल्याने लोक हादरले आहेत. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.