Indian Railway: भारतीय रेल्वे (Indian Railway) केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) संचलित देशातील पहिली खासगी ट्रेन (Private Train) तेजस एक्सप्रेस (Tejas Train) येत्या 14 फेब्रुवारीला पुन्हा नवी दिल्ली-लखनऊ आणि मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. कोरोना महामारीमुळे तेजस एक्सप्रेस गाड्या सुमारे दहा महिने बंद ठेवण्यात आल्या होत्या.
प्रवाशांकडून कॉर्पोरेट ट्रेन तेजस पुन्हा सुरू करण्याची मागणी वाढत असल्याचे आयआरसीटीसीचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने पुन्हा आपले कामकाज सुरू करण्यासाठी नव्या वेळापत्रकांना मान्यता दिली आहे. तथापि, जागतिक साथीच्या सर्व प्रोटोकॉलचे प्रवाशांना काटेकोरपणे पालन करावे लागेल. नव्या वेळापत्रकात रेल्वे मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर गाड्या पुन्हा सुरू केल्या जात असल्याचे आयआरसीटीसीने म्हटले आहे. (वाचा - Mumbai Local सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जय्यत तयारी; सॅनिटायझेशनसाठी विशेष टीम सज्ज)
तेजस रेल्वे गाड्यांचे तिकिट बुकिंग आठवड्यातून चार दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी केले जाईल. लखनौ ते नवी दिल्लीसाठी 870 आणि कानपूर ते नवी दिल्लीचे भाडे 780 रुपये असेल.
प्रवाशांना कोविड-19 संदर्भातील सर्व नियमांचे पालन करावे लागेल -
आयआरसीटीसीनुसार प्रत्येक तेजस एक्स्प्रेस ट्रेनमध्ये 700 हून अधिक प्रवाशांची बसण्याची क्षमता असून प्रवासादरम्यान लोकांना कोविड सेफ्टी किट देण्यात येणार आहे. ज्यामध्ये हँड सेनिटायझरची बाटली, एक मास्क आणि एक हातमोजे देण्यात येणार आहेत.