रुपयाचे चिन्ह (Photo Credits: Pixabay)

डॉलरच्या (Dollars) तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 78 रुपयांच्या खाली गेला आहे. रुपया 43 पैशांनी घसरून 78.28 रुपयांवर आला आहे. खरे तर परदेशी गुंतवणूकदारांची (Foreign investors) विक्री आणि अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीत झालेली वाढ यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची इतकी मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि विदेशी गुंतवणूकदारांची शेअर बाजारात (Stock market) सातत्याने होणारी विक्री यामुळे रुपयात ही घसरण पाहायला मिळत आहे. विशेषतः रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धानंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत आहे.

जागतिक अस्थिरतेमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक काढून घेतल्याने रुपया डॉलरच्या तुलनेत 78.26 रुपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर आला आहे. 23 फेब्रुवारी 2022 रोजी युद्ध सुरू होण्यापूर्वी रुपया डॉलरच्या तुलनेत 74.62 रुपयांवर होता, जो 10 जून 2022 रोजी 77.82 रुपयांवर घसरला आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआयने अनेक नवीन पावले उचलली आहेत. खरे तर अमेरिकेत महागाई वाढली आहे. हेही वाचा Positive News: इयत्ता 10वी परीक्षेत गणीतात 36 आणि इंग्रजीत 35 मार्क्स, आज आहे IAS अधिकारी; लोक म्हणायचे 'हा कामातून गेला'; जाणून घ्या 'सक्सेस स्टोरी

शुक्रवारी अमेरिकेच्या बाजारात मोठी घसरण झाली. आता अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांची सतत विक्री सुरू असून, विदेशी गुंतवणूकदारांचे 14,000 कोटी रुपये विकले जात आहेत. जून महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी 14,000 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. त्याचबरोबर मे महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारीही येणार आहे, याकडे लक्ष लागले आहे.