CAT Exam 2021: सामान्य प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरूवात, पहा कसा कराल अर्ज
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

सामान्य प्रवेश परीक्षा (CAT 2021) नोंदणी प्रक्रिया (Registration process) आजपासून सुरू झाली आहे.  प्रवेशाची ही प्रक्रिया भारतीय व्यवस्थापन संस्था IIM द्वारे आयोजित केली जाईल. विद्यार्थी खाली दिलेल्या माहितीवरून कागदपत्रांची तपशीलवार यादी आणि अर्ज कसा करावा हे पाहू शकतात. ते अधिकृत साइट iimcat.ac.in ला भेट देऊन नोंदणी करू शकतात. कॅट 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. या परीक्षेसाठी (Exams) अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासकीय प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. कॅट 2021 ची परीक्षा संगणक आधारित प्रणालीच्या मदतीने आणि सर्व कोविड -19 सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करून ऑनलाइन घेतली जाईल. यावेळी परीक्षा 28 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे.

आवश्यक कागदपत्रांची यादी

इयत्ता 10 वी आणि 12 वी चे मार्कशीट यासाठी आवश्यक राहणार आहे. ग्रॅज्युएशन मार्क शीट किंवा समकक्ष डिप्लोमा मार्कशीट लागणार आहे. तसेच जे उमेदवार महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात आहेत. त्यांना महाविद्यालयातून द्वितीय वर्ष आणि अंतिम वर्षाची गुणपत्रिका सादर करावी लागेल. कामाच्या अनुभवाचा तपशील, जर असेल तर द्यावा लागेल. श्रेणी प्रमाणपत्र (EWS / NC-OBC / ST / SC / PWD), लागू असल्यास, योग्यरित्या स्कॅन केलेले आणि PDF स्वरूपात द्यावे लागेल. स्वाक्षरी आणि छायाचित्राची स्कॅन केलेली प्रतिमा तसेच फोटो 6 महिन्यांपेक्षा जुना नसावा. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की परीक्षेसाठी अर्ज करताना आणि नोंदणी करताना त्यांना वैध आणि कार्यरत ईमेल आयडी आणि फोन नंबरची आवश्यकता असेल.

परीक्षेसाठी अर्ज कसा करावा ?

कॅटच्या अधिकृत साइट  iimcat.ac.in ला भेट द्या. नवीन नोंदणी ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा ईमेल आयडी, फोन नंबर, नाव, जन्मतारीख आणि इतर कोणताही तपशील देऊन स्वतःची नोंदणी करा. ओटीपी भरा आणि सबमिटवर क्लिक करा. आता तुम्ही तुमचा CAT 2021 ID सक्रिय करू शकता. अर्ज भरण्यासाठी या आयडीचा वापर करून लॉगिन करा. आपले वैयक्तिक तपशील, शैक्षणिक तपशील विचारल्याप्रमाणे भरा. परीक्षा केंद्रे आणि तुम्हाला निवडायच्या असलेल्या कार्यक्रमांची तुमची पसंती द्या. सबमिट वर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट करण्यात आला आहे.  भविष्यातील संदर्भांसाठी डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावे लागणार आहे. अन्यथा CAT 2021 साठी त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कॉमन अॅडमिशन टेस्ट, CAT 2021 परीक्षा दरवर्षी विविध भारतीय पदव्युत्तर आणि डॉक्टरेट कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक भारतीय व्यवस्थापन संस्था, IIM मध्ये घेतली जाते. यावेळी परीक्षा 28 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे.