Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीला लग्नाच्या 28 वर्षानंतर पतीपासून घटस्फोट मिळाला आहे. कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) हा निर्णय दिला आहे. वास्तविक, पत्नीने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती की, पती तिला मारहाण करायचा. तसेच एकदा भांडणाच्या वेळी तो पत्नीच्या तोंडावर थुंकला होता. या घटनेनंतर पत्नीला पतीला घटस्फोट घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ही घटना उत्तर प्रदेशमधील आलोक नगर, लोहमंडी येथील आहे. येथील रहिवासी असलेल्या ज्योती अग्रवालचा विवाह 7 मार्च 1994 रोजी दिल्लीतील आनंद विहार येथे राहणारा पियुष अग्रवाल याच्याशी झाला होता. लग्नात 30 लाख रुपये खर्च झाल्याचे त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. त्यांना 1995 मध्ये एक मुलगा आणि 1997 मध्ये एक मुलगी झाली. छोट्या छोट्या गोष्टींवर सासरची मंडळी टोमणे मारत असल्याचा आरोप ज्योती यांनी केला. (हेही वाचा - Madhya Pradesh Shocker: शेजारणीशी असलेले अवैध संबंध आले मुलासमोर, गुन्हा लपवण्यासाठी बापानेच केली तरुणाची केली हत्या)
ज्योती यांच्या पतीची वागणूक चांगली नव्हती. 1998 मध्ये पतीने तिला मारहाण केली. यानंतर तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. नंतर पियुष अग्रवालने घरी येऊन माफी मागितली आणि तिला सोबत घेऊन आला. काही दिवस या दाम्पंत्यामध्ये सर्वकाही बरं होतं. पण पुन्हा पियुष ज्योतीला भांडू लागला. (हेही वाचा - UP Beating Case: रात्री प्रेयसीला भेटायला जाणं तरुणाला पडलं महागात, चोर समजून तरुणीच्या वडिलांसह भावाने केली मारहाण)
याचिकाकर्त्याने सांगितले की, 5 सप्टेंबर 2017 रोजी पियुष दारूच्या नशेत घरी आला. त्याने ज्योतीला मारहाण केली. तसेच तिच्या तोंडावर थुंकला. पियुषने ज्योतीला बेदम मारहाण केली. 7 सप्टेंबर 2017 रोजी पियुषने ज्योतीला पुन्हा एकदा घराबाहेर काढले. पीडितेने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी वकिलामार्फत 2020 साली कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर आता तब्बल 28 वर्षांनंतर कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश विपिन कुमार यांनी ज्योती आणि पियुषचा घटस्फोटाचा आदेश दिला आहे.