Zakir Hussain Shaikh: दहशतवादी झाकीर शेखला पाकिस्तानकडून सुचना मिळायच्या, महाराष्ट्र एटीएसचा नवा खुलासा
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

बॉम्बस्फोटाद्वारे देश हादरवण्याचा कट रचल्याप्रकरणी मुंबईतून (Mumbai) अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी (Terrorist) झाकीर हुसेन शेखबाबत (Zakir Hussain Sheikh) महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) नवे खुलासे केले आहेत. एटीआयएसने सांगितले की, शेखला पाकिस्तानकडून (Pakistan) दहशतवादी घटना घडवण्याच्या सूचना मिळत होत्या. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी बुधवारी सांगितले की, तपासा दरम्यान संशयित दहशतवादी झाकीर शेखच्या व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (VOIP) कॉलवरून त्याला पाकिस्तानातून कॉल आल्याचे स्पष्ट झाले. फोन नंबर पाकिस्तानचा आहे याबाबत कोणताही ठावठिकाणा लागला नाही, परंतु, IP पत्ता पाकिस्तानचा आहे.

वास्तविक झाकीर हुसेन शेखला 17 सप्टेंबर रोजी मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली होती. झाकीर शेखवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख 11 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र एटीएसच्या कोठडीत आहे. यासोबत त्याचे दोन साथीदार रिझवान मोमीन आणि इरफान शेख हेही अटकेत आहेत. हेही वाचा  Aryan Khan: क्रुझवरील पार्टीत अमली पदार्थ सापडलेच नाहीत, एनसीबीचा छापा बनावट; मंत्री नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

यापूर्वी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र एटीएसने सांगितले होते की झाकीरने चौकशी दरम्यान कबूल केले होते की तो परदेशात बसलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून वागत होता.  मात्र, हा फोन पाकिस्तानातून आला होता की नाही हे त्यावेळी स्पष्ट झाले नव्हते.  त्याच्या चौकशीच्या आधारावर, जेव्हा एटीएस मुंब्रा येथील रिझवानच्या भाड्याच्या घरात पोहोचला तेव्हा त्याला तेथे आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली.

महाराष्ट्र एटीएसच्या म्हणण्यानुसार, झाकीरसह अनेक दहशतवादी मुंबईच्या लोकल ट्रेनसह अनेक गर्दीच्या भागात स्फोट घडवण्याचा विचार करत होते. यासाठी या ठिकाणांची गणना करण्यात आली. समीर कालियाच्या सांगण्यावरून झाकीरला अटक केल्याचेही तपासात समोर आले आहे. एटीएसच्या मते, 'डी' कंपनीकडून समीर कालियाला निधी, शस्त्रे आणि स्फोटके पुरवली जात होती.