Indore: उंदरी मारण्यासाठी ठेवलेला विषारी गूळ खाल्याने किशोरवयीन मुलीचा मृत्यू, इंदूरमधील घटना

Indore: इंदूरच्या राऊ पोलीस स्टेशन परिसरात ओमप्रकाश राठोड राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी उंदीर घरातील सामानाची नासधूस करत असल्याचे त्यांना आढळले होते. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी राठोड यांनी त्यांच्या घरात एका ठिकाणी गूळ(Jaggery)ला उंदीर मारण्याचे विषारी द्रव्य ( Poison)लावून ठेवले होते. मात्र, त्यांच्या या ट्रिकचा उलटाच परिणाम झाला. तो गुळ त्यांच्या १६ वर्षीय मुलीने खाल्ला आणि त्यात तिचा मृत्यू (Teenage girl die) झाला. अंजली राठोड असे मृत मुलीचे नाव आहे. ती नववीत शिक्षण घेत होती. (हेही वाचा :Dehradun Shocker: डेहराडूनमध्ये 30 वर्षीय आत्याचे 16 वर्षांच्या भाच्यासोबत लैंगिक संबंध; गर्भवती राहिल्यानंतर समोर आला प्रकार, कोर्टाने सुनावली 20 वर्षांची शिक्षा )

इंदूरच्या रंगवासा परिसरात ओमप्रकाश राठोड हे त्यांच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. कुंटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते फुलांचा व्यवसाय करतात. रविवारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंबीयांना धक्का बसला आहे. अंजील घरातील मोठी मुलगी होती. मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी अंजलीला उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. तिची तब्येत खालावली होती. कुटुंबीयांनी तात्काळ तिला रुग्णलयात दाखल केले. तिच्यावर दोन दिवस रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, मंगळवारी अंजलीचा मृत्यू झाला.

दरम्यान, प्राथमिक तपासात तिचा मृत्यू विषारी पदार्थ खाल्ल्यानेच निष्पण्ण झाले. कुटुंबीयांनी उंदीर मारण्यासाठी विषारी द्रव्य असलेला गूळ घरात एका ठिकाणी ठेवला होता. मात्र, या घटनेनंतर त्यांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना तो दिसला नाही.