
Tamilnadu Shocker: तामिळनाडूच्या विल्लुपुरममधील एका खासगी सीबीएसई शाळेच्या मुख्यध्यापकाला दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विल्लुपूरमच्या या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कार्तिकेयन असं आरोपीचा नाव आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत अटक करण्यात आले आहे. विल्लुपुरम पोलिस ठाण्यात अंरर्गत कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा- IIT BHU सामुहित बलात्कार प्रकरणी 200 हून अधिक पानांचा आरोपपत्र दाखल)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक शोषणाची घटना ही ऑक्टोबर महिन्यात घडली होती. मात्र ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. कार्तिकेयन हा आधी एका तामिळ वाहिनीवर न्यूज अॅंकर म्हणून काम करत होता त्यानंतर त्यांना तेथून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांना शाळेत मुख्यध्यापक म्हणून पोस्ट मिळाली. दोन दहावीतल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण केल्याचे समोर आलं. त्यांना एका खोलीत बोलवून मिठी मारत आणि त्यांचं चुंबन घेत असल्याचं समोर आले. या घटनेची माहिती पीडित मुलींनी पालकाकडे तक्रार केली. पालकांनी या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात केली.
मुलींच्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पीडित मुलींनी कोर्टासमोर याचिका सादर केली ज्यात लिहलं होत की, आरोपीने अंगाला अयोग्यरित्या स्पर्श केला. पोस्को कायद्याअंतर्गत आरोपी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.