
तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) शिवकाशीजवळील कोंगलापुरम गावात (Kongalapuram Village) 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) करून तिची हत्या (Murder) करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आसाममधील नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी मागच्या सोमवारी तिच्या घराजवळून बेपत्ता झाली होती. तेव्हापासून पीडितेचे कुटुंब आणि पोलिस तिचा शोध घेत होते. दरम्यान, पीडितेच्या घराजवळ अर्धा किलोमीटरच्या अंतरावर तिचा मृतदेह सापडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यासंदर्भात हिंदूस्थान टाईम्सने वृत्त प्रकाशित केले आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कामानिमित्त तामिळनाडूमध्ये आलेल्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात आरोपी माजिद अली (वय -20) याचाही समावेश होता. या सहा जणांची कसून चौकशी केल्यानंतर माजिदने गुन्ह्याची कबुली दिली. माजिदकडे पीडित मुलगी मदत मागण्यास आली होती. यावेळी आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला. (हेही वाचा - धक्कादायक! 2018 मध्ये प्रतिदिन सरासरी 109 बालकांचे लैंगिक शोषण; अल्पवयीन मुलांवरील बलात्काराच्या घटनेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर)
इयत्ता तिसरीत शिकणारी पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी त्यांच्याकडे जात होती. परंतु, ती बेपत्ता झाली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी यासंदर्भाच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पीडितेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पीडितेचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.