Rahul Gandhi, Supreme Court (PC - Facebook Wikimedia Commons)

Modi Surname Defamation Case: मोदी आडनाव बदनामी प्रकरणी (Modi Surname Defamation Case) गुजरात उच्च न्यायालयाविरुद्ध (Gujarat High Court) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या याचिकेवर 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले. गुजरात उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या आदेशात राहुल गांधींना ताशेरे ओढले होते. त्यानी केलेल्या टिप्पण्यांमुळे समुदायाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. गुजरातमधील पूर्णेश मोदी (Purnesh Modi) नावाच्या भाजप आमदाराने ही यासंदर्भात याचिक दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी गुजरात सरकार आणि भाजप आमदार आणि तक्रारदार पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाला 10 दिवसांच्या आत नोटीसवर उत्तर दाखल करावे लागेल. (हेही वाचा - Brij Bhushan Sharan Singh Grants Regular Bail: लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर)

सुरत न्यायालयाने दिलेला निकाल गुजरात उच्च न्यायालयाने राखून ठेवत राहुल गांधींना खासदार म्हणून अपात्र ठरवले होते. कारण त्यांना न्यायालयाने 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, या आदेशाविरोधात काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन आव्हान दिले होते.