Amit Shah's Edited Video Case: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बनावट व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांना समन्स बजावले (Revanth Reddy Summoned) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रेवंत रेड्डी यांना 1 मे रोजी त्याच्या वापरलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससह चौकशीसाठी बोलावले आहे.
आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, बनावट व्हिडिओ शेअर करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसह आणखी पाच जणांनाही दिल्ली पोलिस समन्स बजावणार आहेत. गृहमंत्रालय आणि भाजपच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी एक दिवसापूर्वीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज रेड्डी यांना दिल्ली पोलिसांनी समन्स बजावलं आहे. (हेही वाचा -Lok Sabha Election 2024: पीएम नरेंद्र मोदींना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची याचिका Delhi High Court ने फेटाळली, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
Revanth Reddy summoned by Delhi Police in Amit Shah's edited video case: Sources. Watch this report for more insights #RevanthReddy #FakeVideo #AmitShah #DelhiPolice @nabilajamal_ pic.twitter.com/C5FddX5L0I
— IndiaToday (@IndiaToday) April 29, 2024
स्पेशल सेलने भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांनुसार आणि आयटी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला आहे. काही मॉर्फ केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर 'समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शेअर केले जात आहेत, ज्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे' असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.