Express | Representational Image | (Image Credits: Facebook)

चेन्नई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमधील (Rajdhani Express) धुरामुळे आंध्र प्रदेशातील नेल्लोर (Nellore) जिल्ह्यात रविवारी प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रेल्वेच्या बी-5 डब्यातील चाकांजवळून धूर येऊ लागला, जे पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. धूर निघत असल्याने कवळी रेल्वे स्थानकाजवळ सुमारे 20 मिनिटे गाडी थांबवण्यात आली होती. चेन्नई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमधून निघणाऱ्या धुराची तपासणी केल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्रेक जॅममुळे धूर निघत आहे. ट्रेन दुरुस्त करून पुन्हा प्रवास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हेही वाचा The Elephant Whispers: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली रघू आणि बोम्मीची भेट

यापूर्वी पुणे ते जम्मू तवी दरम्यान धावणाऱ्या झेलम एक्स्प्रेसमधून धूर निघू लागला होता. यामुळे प्रवाशांनी साखळी ओढत ट्रेन थांबवली. रेल्वे अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आऊटरवर ट्रेन थांबवून धुराची तपासणी करण्यात आली. ट्रेन गार्ड आणि लोको पायलटने डब्याची तपासणी केली. सांगितले की धूर निघण्याचे कारण डायनॅमो बेल्टची उष्णता आहे.

यानंतर डायनॅमोचा पट्टा काढून दुसऱ्या डब्याला जोडण्यात आला आणि सर्व गोष्टी सामान्य झाल्यानंतर ट्रेन सुरू करण्यात आली. याशिवाय अजमेरहून ब्रांद्राकडे जाणाऱ्या अजमेर-वांद्रे ट्रेनलाही ब्रेक जॅम झाल्याने आग लागली. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बाहेर काढून नियंत्रणात आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, किशनगढ रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून, सुमारे अर्धा तास दुरुस्ती करून गाडी रवाना करण्यात आली.