Arvind Kejriwal Attacked (फोटो सौजन्य - X/@AamAadmiParty)

Arvind Kejriwal Attacked: आम आदमी पक्षाने (AAP) भाजप (BJP) वर मोठा आरोप केला आहे. आपने एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, निवडणूक प्रचारादरम्यान भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या गाडीवर विटा आणि दगडांनी हल्ला केला. आम आदमी पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हल्ल्याच्या आरोपावर प्रवेश वर्मा यांनी म्हटलं आहे की, केजरीवाल यांनी त्यांची गाडी आमच्या कार्यकर्त्यांवर चालवली. यामध्ये माझ्या एका कामगाराचा पाय मोडला.

आपने ट्विटरवर व्हिडिओ जारी करताना म्हटलं आहे की, पराभवाच्या भीतीने भाजप संतापला असून अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांच्या गुंडांनी हल्ला केला. प्रचार करत असताना, भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला केला आणि त्यांना प्रचार करू नये म्हणून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला. भाजपवाल्यांनो, तुमच्या भ्याड हल्ल्याला केजरीवाल घाबरणार नाहीत, दिल्लीचे लोक तुम्हाला योग्य उत्तर देतील. (हेही वाचा -Delhi Assembly Election 2025: महिलांसाठी 2500 रुपये, LPG सिलेंडरवर 500 रुपयांचे अनुदान; दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा सादर)

अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक, पहा व्हडिओ - 

दरम्यान, दिल्लीतील मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, असे गुप्तचर विभागाने आधीच पोलिसांना इनपुट दिले होते. हा हल्ला दहशतवादी हल्ला देखील असू शकतो. ज्या नेत्यांवर हल्ल्याची माहिती मिळाली आहे त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आपचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह 12 राजकारण्यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Delhi Assembly Election Schedule: दिल्ली विधानसभा निवडणूक वेळापत्रक;5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला मतमोजणी, जाणून घ्या संपूर्ण तपशील)

मोठे नेते दहशतवाद्यांचे लक्ष्य -

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी, विशेष शाखेने दिल्ली पोलिसांना माहिती दिली आहे की, निवडणुकीदरम्यान भाजप, आप आणि काँग्रेस या तीन प्रमुख राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांवर हल्ला होऊ शकतो. यामध्ये पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेस नेते संदीप दीक्षित आणि आपचे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री आतिशी यांचा समावेश आहे. नेत्यांवरील प्राणघातक हल्ल्याबाबत दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला मिळालेल्या माहितीत हल्ला कसा होऊ शकतो याचा उल्लेख नाही.

सुरक्षेत वाढ -

दिल्ली पोलिसांच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, लवकरच नेत्यांची सुरक्षा वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय, रॅली आणि सार्वजनिक सभांमध्ये सुरक्षा वाढवण्यासोबतच, साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सर्व जिल्हा पोलिसांना निवडणूक रॅली आणि घरोघरी प्रचारासह नेत्यांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.