Sonia Gandhi | (File Photo)

Sonia Gandhi Admitted to Hospital: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांना गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली सध्या रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी कोरोना संसर्गाच्या विळख्यात आल्या होत्या. यानंतर सोनिया गांधी यांना संसर्गामुळे काही समस्या येत होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (हेही वाचा - Nitin Gadkari यांच्या अटीवर खासदार Anil Firojiya यांनी कमी केलं 15 किलो वजन; गडकरींकडे केली 15 हजार कोटींची मागणी, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या)

दरम्यान, काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधींना पुन्हा समन्स बजावले आहे. आता त्यांना 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. याआधी ईडीने 8 जून रोजी सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती.

ईडीने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनाही समन्स बजावले आहे. ते 13 जूनला ईडीसमोर हजर होणार आहेत. मात्र, या प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.